कळवा परिसरात ‘कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णांच्या सील केलेल्या इमारती मधील नागरिकांचे हाल

__ कळवाः (बातमीदार) कळवा परिसरात कोरोनाचे दहा रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून कळवा परिसरातील पारसिक नगर,मधील एक टांवर, मनीषा नगर मधील एक चाळ व विटावा परिसरात वा पारसरात एक इमारत सील करण्यात आली.या इमारतीत सापडलेले रुग्ण रुग्णालयात नेण्यात आले. व या मध्ये राहणाऱ्या नागरिकांना ना आपल्या घरी पुढील १४ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच सच ही लावण्यात आली आहे परंतु या सील केलेल्या नागरिकांना घराबाहेर पडता पडता त्याना अधिकाऱ्यानी सर्व जी व न । व २ य क वस्त भाजीपाला,दध परवला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र तीन दिवसातच आश्विासन हवेत विरले आहे. त्याना सध्या अनेक समस्याना सामोरे जावे लागत असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या इमारतीमध्ये राहणा-या काही नागरिकांशी संपर्क साधला असता पारसिक नगर मधील विराट टांवर मध्ये पोहचविणारा वाणी साखर आटा.शेंगदाणे.तांदळ.कांदे अश्या जीवनावश्यक प्रत्येक अश्या जीवनावश्य वस्तू मागे तीस ते चाळीस रुपये जास्त घेऊन पोहचवत असल्याची माहिती तेथे एकट्या राहणाऱ्या वृद्ध जाधव काकी यानी दिली. तर मनीषा नगर चिंतामनी चाळीत गेल्या तीन दिवसा पासून भाजीपाला पोहचला नाही , विट व्या ताल ओमसिद्धी अपार्टमेंट मध्ये स्थनिक नगरसेवका कडून फक्त दुधच पुरवला गेला आहे . अन्नधान्य व तांदूळ ,भाजीपाला पुरवला जात नसल्याने येथील रहिवासीयांचे मोठे हाल झाले आहेत त्यामुळे 'रोगापेक्षा इलाज भयंकर' अशी अवस्था येथे राहणाऱ्या नागरिकांची झाली आहे.